Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

शिवराज महाविद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात


गडहिंग्लज (प्रतिनिधी):
येथील शिवराज महाविद्यालयात फिजिक्स विभाग व विज्ञान मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'राष्ट्रीय विज्ञान दिन' उत्साहात संपन्न झाला.

प्रारंभी फिजिक्स विभागाचे माजी विभाग प्रमुख डॉ. एम.पी.पाटील यांच्या हस्ते थोर शास्त्रज्ञ डॉ.सी.व्ही.रामन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी सायन्सच्या विद्यार्थ्यांनी 'रिसेंट ट्रेंडस इन सायन्स' या विषयावर तयार केलेले पोस्टर प्रेझेन्टेशनचे उदघाटन प्रा.सौ.बिनादेवी कुराडे यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले.

यावेळी प्राचार्य डॉ.एस.एम.कदम यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केलेल्या व्याख्यानामध्ये फिजिक्स विभागाचे माजी विभाग प्रमुख डॉ.एम.पी.पाटील यांनी मार्गदर्शनामध्ये विज्ञान हीच काळाची गरज कशाप्रकारे आहे. त्याचबरोबर विज्ञानाशिवाय तरणोपाय नाही. विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक दृष्टीकोन आत्मसात करावा. तसेच विज्ञानाच्या माध्यमातून आपल्या जीवनाची वाटचाल करावी तरच आपण खऱ्याअर्थी यशस्वी व्हाल असे प्रतिपादन डॉ. पाटील यांनी केले. तसेच थोर शास्त्रज्ञ डॉ. सी. व्ही. रामन यांच्या वैज्ञानिक कार्याबाबत सखोल मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमात प्राचार्य डॉ.एस.एम.कदम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी महाविद्यालयाच्या वतीने घेण्यात आलेल्या 'ऑनलाईन क्वीझ काँन्टेस्ट' स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.

कार्यक्रमास विज्ञान मंडळाचे समन्वयक प्रा.जे.व्ही.सरतापे, नॅकचे समन्वयक प्रा. किशोर आदाटे, प्रा.ए.बी.कोकणे, प्रा. तेजस्विनी शिंदे, प्रा.रेवती राजाराम, डॉ.विद्या देशमुख, प्रा.संकेत पाटील, प्रा. प्रवीण सरनोबत, प्रा.टी.ए.काझी यांच्यासह सर्व प्राध्यापक विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.

स्वागत व प्रास्ताविक डॉ.विजय सावंत यांनी केले. सूत्रसंचालन प्रा.गौरव पाटील यांनी केले तर आभार प्रा. प्रवीण गंदूगडे यांनी मानले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.