Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

शिवराज महाविद्यालयात शहीद दिन


गडहिंग्लज (प्रतिनिधी):
येथील शिवराज महाविद्यालयात राज्यशास्त्र व एन.सी.सी.विभाग यांच्यावतीने शहीद दिन संपन्न झाला. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.एस.एम.कदम होते.

स्वागत व प्रास्ताविक डॉ.ए.जी.हारदारे यांनी केले. या कार्यक्रमात शहीद भगतसिंग यांच्या प्रतिमेचे पूजन संस्थेचे सचिव डॉ. अनिल कुराडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ.एन.आर. कोल्हापुरे यांनी शहीद भगतसिंग यांनी केलेल्या क्रांतिकारी कार्याबाबत सविस्तर मार्गदर्शन करून भगतसिंग व त्यांच्या क्रांतिकारकांनी केलेल्या बलिदानामुळे या देशाला खऱ्याअर्थी स्वातंत्र्य मिळाले. त्यांच्या देशकार्याचा आदर्श आजच्या नव्या पिढीने घेणे आवश्यक आहे असे प्रतिपादन केले.

यावेळी एन.सी.सी.विभागाच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या शहीद भगतसिंग यांच्या क्रांतिकारी कार्याची माहिती देणार्‍या भित्तीपत्रकाचे उदघाटन प्रा.सौ.बिनादेवी कुराडे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास पर्यवेक्षक प्रा. तानाजी चौगुले, रजिस्ट्रार संतोष शहापूरकर, सर्व प्राध्यापक, प्रशासकीय सेवक, एन.सी.सी. कॅडेट, खेळाडू, विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते. आभार एन. सी. सी. विभाग प्रमुख कॅप्टन डॉ.राहुल मगदूम यांनी मानले.



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.